मराठी साहित्य संमेलन, 2001

इंदूरात 19, 20, 21 जानेवारी 2001 मध्ये 74वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्र साहित्य सभेच्या पुढाकाराने भव्य प्रमाणात साजरे झाले. नेतृत्व होते स्वागताध्यक्ष म्हणून इंदूरच्या लोकप्रिय खासदार आणि केन्द्रीय शासनाच्या तत्कालीन महिला बाल विकास राज्यमंत्री आदरणीय श्रीमती सुमित्रा महाजन.

होलकरांच्या राजधानीत इंदूरला भव्यपणे निघाली ग्रंथदिंडी !

होलकरांच्या राजधानीत इंदूरला 19 जानेवरी 2001 ला सकाली मराठीच्या जयजयकाराने दुमदुमून गेली, समर्थ मठ, पंत वैद्य कालोनी, गणेश कालोनीहून रामबागेच्या इदूरंच्या रस्त्यांवरून वाजत गाजत ग्रथदिंडी पुढे सरकत होती, तेव्हा तिच्यावर फुलांचा वषार्व झाला, जय भवानी जय शिवाजी च्या गर्जना निनादल्या आणि ग्यानबा तुकाराम घोषाचा बुक्का हवाभर भरून राहिला संत तुकारामाच्या वेषभूषेत श्री खुंटे शोभून दिसत होते, रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी  हे भजन ते तालबद्द सुरात म्हणतहोते. खरोखरच संत तुकाराम अवतरले की काय असा भास श्री अनंत खुंटे यांनी आपल्या पदन्यास आणि अभिनयावरून संत तुकाराम साकार केला. सर्वांनी त्यांचे खूप कौतुक केले. मराठी भाषिकांच्या वरील वस्तीत असलेल्या समर्थ मठ मंदिरापासून सकाली नउनंतर थोडयाच वेलात दिंडी सुरू झाली. तिच्या अग्रभागी नगारा आणि सनई - चौघडा होतेच, पण नउवारी आणि नथ अशा थाटाच्या घोडेस्वार तरूणींचे पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकरांची अहिल्या सेना होती यांचे सोबत 14 होलकर राज्यकर्ते होलकरी वेशभूषेत शोभून दिसत होते यांची रंगभूषा व वेशभूषा अहिल्या नाटय मंडलाचे श्री सुनील मतकर यांनी केली होती. इंदूरातला राजकमल ब्रास बैंड मराठी गाणी वाजवत होता. चित्ररथावर शिवराय आणि मावले तसेच राष्ट्रीय नेते होते. तरूणांच्या घोडेस्वार पथकाने मराठी पद्धतीची निरनिराली शिरोभूषणे घातली होती. दिंडीतला महिलांचा सहभाग लक्षणीय होता. तालावर भजन म्हणणान्या आणि ग्यानबा तुकारामाचा गजर करणान्या पथकात केंद्रीय मनुष्यबल राज्यमंत्री आणि इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन स्वत: सहभागी झाल्या आणि नाचू गाउ लागल्या. काही महिला यांच्यासोबत फुगडी सुद्धा अधून मधून खेलताना पाहून रस्त्यावरील लोकांनी या उत्साहाबद्दल खूप कौतुक केले. मील क्षेत्राच्या वारकन्यांच्या दिंडीची पखवाजाच्या साथीवर भजने चालली होती. मराठी वस्तीमधून सर्व प्रमुख रस्त्यांवरून ही रंगबिरंगी मिरवणूक अभय प्रशालच्या संमेलन होत असलेल्या संकुलात पोहोचली.

नव्या अध्यक्षा विजया राजाध्यक्ष, मावलते अध्यक्ष य.दि. फडके, मराठी महामंडलाच्या अध्यक्षा वसुंधर पेंडसे नाईक यांच्यासाठी होता सजवलेला टांगा. ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर आणि मूलचे इंदूरचे अरूण दाते सपत्नीक सुरूवातीपासून दिंडीत होते. पण दरवर्षीप्रमाणेच फार थोडे लेखक दिंडीत दिसत होते. मिरवणूक सूरू होण्याआधी पालखीत ठेवलेल्या ग्रंथराजांचे पूजन करण्यात आले आणि ही सजवलेली लालचुटूक पालखी मराठमोल वेष घातलेल्या शिलेदारांनी आपल्या खांद्यावर घेतली. मिरवणुकीच्या मार्गावर मराठी संस्थांनी तर स्वागत केलेच. पण शीख, हिन्दी, गुजराती, दाउदी, बोहरा आणि मुस्लिम या समाजाच्या मंडलीनीही पालखीचे पूजन केले, कमानी उभारल्या, फुले उधकली, ग्रंथदिंडी पुण्यश्लोक अहिल्या नगरीत आल्यावर डा. य.दि. फडके यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उद् घाटन झाले.

इंदूरचे 74 वें अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - उदघाटन सोहळा

मूलचे इंदूरचे आणि आता अमेरीकेत सिलिकान व्हलीत आपल्या कर्तबगारीची मुद्रा उमटवणारे उद्योजक श्री प्रकाश भालेराव म्हणाले की, भारतच नव्हे, तर चीन, जापान, रशिया आणि यूरोप या सर्वच ठिकाणी भाषांवर जागतिकीकरणाचे आक्रमण होत आहे. श्री भालेराव यांनी दीपप्रज्ज्वलन करून पुण्यश्लोक अहिल्या नगरीतील 74 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले, तेव्हा हजारों इंदूरकरांनी टालयांचा कडकडाट केला. श्री भालेराव यांच्या आधी महामंडलाच्या अध्यक्षा वसुंधरा पेंडसे नाईक यांनी वर्षभरातील कामाचा आढावा घेतला, तर डा. य.दि. फडके यांनी अध्यक्ष म्हणून सीमा प्रश्न केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. श्री फडके यांनी सुवर्णपदक देउन अध्यक्षपदाची सूत्रे विजया राजाध्यक्ष यांच्या हवाली केली. स्वागताध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मरण करून मालव्यात मराठी माणसाने गेली कित्येक शतके गाजवलेल्या कर्तबगारीचा उल्लेख केला.

“शिक्षण हेच केंद्र” - सौ. विजया राजाध्यक्ष

आपले मूल 40 पानी छापील भाषण बाजूला ठेवून निवडक उतारे सादर करताना श्रीमती विजया राजाध्यक्ष म्हणाल्या की, मराठीवर होणारे आक्रमण आणि तिचे भवितव्य याची चिंता सर्वांनाच आहे. मराठी जपण्याच्या कामात अनेकदा नोकरशाही मनोवृत्ती डोकावते. त्यामुले, काहीशा स्वायत्त असणान्या विद्यापीठांनी या कामात हिरीरीने सहभागी व्याहला हवे. शिक्षणक्षेत्राकडे होणारे दुर्लभ मराठी भाषेचे नुकसान करते. त्यामुले उद्याचा वाचक तयार करण्यासाठी प्राथमिक आणि माध्यमिक तसेच विद्यापीठ शिक्षकांकडे अधिक लक्ष द्यायलाच हवे. शिक्षण क्षेत्र हेच वाडमयीन संस्कृतीचे संगोपन करणारे केंद्र असते.

इंदूरला आयोजित पहिले इन्डोअर साहित्य संमेलन

इंदूर दि. 18 जानेवारीत इंदूरमध्ये वलवाचा पाउस पडण्याची शक्यता गृहित धरून आणि कडाक्याच्या थंडीचा होणारा त्रास ध्यानी घेरून उद्यापासून इंदूर येथे सुरू होणारे 74 वें अ. भा. साहित्य संमेलन. प्रथमच खुलया जागेत होण्याएवजी बंदिस्त अशा इनडोअर स्टेडियम मध्ये होत आहे.

इनडोअर स्टेडियम मध्ये होणारे हे पहिलेच मराठी साहित्य संमेलन असून, संमेलनाच्या तयारीवर अखेरचा हात फिरविला जात असून, लांबलांबचे प्रतिनिधी, मान्यवर साहित्यिक आणि काही पूर्वाध्यक्ष डेरेदाखल होण्याला सुरूवात झाली आहे. इंदूरमध्ये प्रतिवर्षी डिसेंबर - जानेवारीमध्ये अनपेक्षित वलवाचा पाउस पडतो आणि त्यापाठोपाठ कडाक्याची थंडी जाणवत असल्यामुले साहित्य संमेलनात त्याचा अडथला व त्रास जाणवू नये म्हणून आम्ही हे संमेलना बेदिस्त, सोयिस्कर जागी घेण्याचे ठरविले आहे, असा खुलासा या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष व केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन यांनी सायंकाली घेतलेल्या वातांहर बैठकीत आवर्जून केला. इनडोअर स्टेडियमध्ये 14 हजार प्रतिनिधी बसण्याची सुविधा असून, त्याच्या गोलाकार रचनेमुले वेगलेपण जाणवेल.

स्वागताध्यक्ष सुमित्रा महाजन आणि महामंडल अध्यक्षा वसुंधरा पेंडसे नाईक यांनी संमेलन स्थली फेरफटका मारून तयारीची पाहणी केली आणि एकूणच तयारीबद्दल समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख उद्घाटन समारंभाला येउ शकणार नाहीत. मात्र त्याएवजी ते दुसन्या दिवशी होणन्या बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिकांच्या मराठी भाषिकांकडून अपेक्षा या विषयावरील परिसंवादाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र महाराष्ट्राचे प्रतिनिधि म्हणून सांस्कृतकि कार्यमंत्री प्रा. रामकृष्ण मोरे उपस्थित राहणार असल्याचा संदेश आयोजकांना मिलाला आहे. तीन दिवसांच्या साहित्य संमेलनाचा अंदाजित खर्च आयोजकांनी 70 लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज केला असून, प्रारंभीचा खर्च म्हणून महाराष्ट्र सरकारने प्रथेप्रमाणे 25 लाख रू. चा धनादेश या पूर्वीच आयोजकांकडे सुपुर्द केला आहे. म.प्र. सरकारनेही आपला वाटा म्हणून संमेलनासाठी 5 लाख रू. चे अर्थसाह्य दिले आहे. संमेलनात ग्रंथप्रदर्शनाचे एकूण 86 स्टाल असून, त्यांचे वाटप आज दुपारीच झाले. या स्टालखेरीज मध्यप्रदेशातील साहित्यकांचे जीवनदर्शन, मालवा परिसरातील लेखक, कवी चित्रकार व कलावंतांचा परिचय घडवून देणारे स्टाल उभारले आहेत.

दरम्यान, आज सकाली संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा डा. विजयबाई राजाध्यक्ष यांचे मुंबई येथून इंदूरला आगमन झाले असून, त्यांचे अत्यंत उत्साहात यथोचित स्वागत करण्यात आले, एवढेच नव्हे तर संध्याकालच्या वार्ताहर बैठकीत डा. राजाध्यक्ष मुद्दामहूत उपस्थिति राहिल्या. पूर्वाध्यक्षांपैकी गंगाधर गाडगील आणि वसंत बापट हे दोघे इंदूरमध्ये डेरेदाखल झाले आहेत. ना. सं. इनामदार आणि द.मा. मिरासदार हे ही रात्रीपर्यंत येण्याचे अपेक्षित आहे.

प्रचंड गर्दीत ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन

संमेलनातील अहिल्या माता नगरीत लोकांची मोठी गर्दी आणि त्यामुले झालेल्या रेटारेटीमुले स्वत: ला कसेबसे सावरीत 19 जानेवरी, 2001 शुक्रवारी सकाली दीड तास विलंबाने मावलते संमेलनाध्यक्ष डा. य.दि. फडके यांनी ग्रंथग्राम आणि ग्रंथ प्रदर्शनाचे रीतसर उद् घाटन केले.

रात्रीची ओसरू लागलेली थंडी आणि दुपारच्या चढत जाणान्या उन्होने कावलेल्या डा. फडके यांनी फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद् घाटन केले खरे, परंतु नंतर ओपचारिक भाषण करण्याचे टालले. काही प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतत्यावर ते एवढेच म्हणाले, महाराष्ट्रात काय, पण बृहन्महाराष्ट्रात देखील सांस्कृतिक आणि एकूणच ग्रंथ व्यवहार वाढणे आवशयक आहे.

शहराच्या विविध भागातून फिरत संमेलन स्थानी आलेल्या ग्रंथदिंडीचे संमेलनाच्या प्रांगणात प्रथम स्वागत करण्यात आल्यावर ग्रंथपालखी विधीवत संमेलनाचे उद् घाटन समारंभ ज्या इन्डोअर स्टेडियममध्ये होणार आहे, तेथे व्यासपीठावर विराजमान करण्यात आली. तेथून मग मावलते अध्यक्ष डा. य.दि. फडके उद् घाटक प्रकाश भालेराव, ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर गाडगील, स्वागताध्यक्ष सौ. सुमित्रा महाजन, महामंडल अध्यक्षा वसुंधरा पेंडसे नाईक, कथा लेखक रा. रं. बोराडे हे सारेच त्या ग्रंथप्रदर्शनाचे उद् घाटन झाल्यावर ग्रंथ प्रदर्शनातील विविध प्रकाशकांच्या स्टाल्सवर जाउन ग्रंथांची पाहणी करण्यात मग्न झाले. ग्रंथप्रदर्शनात 76 स्टैंड मराठी ग्रंथ प्रकाशकांचे होते.

इंदूरच्या नामवंत साहित्यिकांचे, कर्तबगार मराठी माणसाचे छायाचित्र प्रदर्शन कलावंत व फोटोग्राफर श्री भालू मांढे यांच्या संयोजनाने भरले होते. कलावंत श्री मोंढे यांनी अत्यंत रेखीवपणे हे मराठी कर्तबगार व महान पुरूषांचे छायाचित्र माडले होते.

ग्रंथ प्रदर्शनात लक्ष बेधून घेतले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकरांच्या इंदूर नगरीचे साहित्यिक व सांस्कृतिक दर्शन घडविणान्या स्टाल ने. डा. गणेश मतकर यांनी अभ्यासपूर्वक आणि उपलब्ध केलेल्या दुर्मिल चित्रमय ऐतिहासिक विवरणाच्या या स्टालवर इंदूर मध्ये झालेल्या आधीच्या दोन मराठी साहित्य संमेलनाची छायचित्रे, मंडपांचे नकाशे, अध्यक्षीय भाषणे, राजघराण्यातील व्यक्तींची छायाचित्रे, पूर्वीच्या कालातीत जुन्या इमारती राजवाडे यांच्या छायाचित्राखेरीज होलकर राज्यातील व्यवहारात येणान्या शब्दांची यादी अर्थासह मांडलेली दिसते. अहिल्यादेवींच्या हस्ताक्षकराचा नमूनाही आहे. हा सारा दस्ताऐवज पाहण्यासाठी इंदूरकर मराठी भाषिक ग्रंथ प्रदर्शनाला गर्दी करीत होती.

74 व्या संमेलनात उपस्थित संपूर्ण देशातील नामवंताची सूची

मराठी साहित्यिक रंगभूमि कलावंत - डा. विजया राजाध्यक्ष, सौ. वसुंधरा पेंडसे नाईक, डा. सुहासिनी कीर्तकिर, डा. य.दि. फडके, ग.ना. जोगलेकर, जागतिक कीर्तीचे उद्योजक श्री प्रकाश भालेकर, कवी ना. धों. महानोर, प्रा. गंगाधर गाडगील, कवी वसंत बापट, कवी रविन्द्र भट, रंगभूमि कलावंत संस्कृत विद्वान दाजी भाटवडेकर, रा.रं. बोराडे, संगीत दिग्दर्शक यशवंत देव, श्रीपाद जोशी, गो. दा. जिमये, डा. उमा दादेगांवकर, पंडित आवलीकर, निशिकांत मिरजकर, राम गबाले, वीणा आलासे, संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके, गायक रवीन्द्र साठे, गायक अरूण दाते, डा. अर्पणा जोशी, डा. सुधीर रसाल, डा. केशव मेश्राम, प्रभाकर महाजन, डा. प्रकाश मेदककर, डा. उत्तम मयेकर, अवधूत शास्त्री, दिलीप देशपांडे, डा. प्रज्ञा लोखंडे, रवीन्द्र धवी, सौ. मंगला गोडबोले, डा. उत्तम रूद्रवार, श्रीराम पुजारी, दीपक धार, सौ. मंगला खाडीलकर, विनायक जोशी, विमला वाणी, प्रा. चंद्रकांत पाटील, सौ. मीना गांखले, प्रा. उत्तम कांगले, संजीव कुमार सोनवणे, आशा बगे, नारायण शिरसाली, डा. वि. भा. देशपांडे, प्रो. चंदन शिव, मनोहर सप्रे, संजीव लाटकर, डा. निरंजन उजगरे, विनायक नाईक, कवी ज्योत्सना कदम, शीला धारगांवकर, रमा मराठे, सुधा म्हात्रे, श्री कल्याणी, प्रमोदकुमार अणेराव, नितल वढावकर, मनोहर शक, मन्मय सतसिंग, अप्पा बेलसरे, जयश्री कालवीट, वंदना कुलकर्णी, स्वाती शहा, बवन पवार, मलिका अमरशेख, सूर्यकांत कुलकर्णी.

महाराष्ट्रातून आलेले प्रमुख पत्रकार - सर्वश्री रघुनाथ राजाराम शटकर वृत्त मानस मुंबई, सुभाष इनामदार ई. सकाल पुणे, श्रीमती संजीवनी खेर लोकप्रभा मुंबई, डी.पी. जोशी मराठी साहित्य परिषद् आ. प्रदेश, सुनील कर्णिक आपला महानगर मुंबई, संजय आवटे दैनिक संचार कोल्हापुर, मिलिंड शेंडे लोकमान्य सांज वार्ता पुणे, सचिन खडके लोकमान्य सांज वार्ता पुणे, दत्ता डांगे गोदातीर समाचार नांदेड, रविन्द्र पांचाल लोकसत्ता मुंबई, श्रीमती स्वाती खेडकर लोकसत्ता मुंबई, उदय मालपाठक दैनिक पुढारी कोल्हापुर, श्रीमती नंदिनी आत्मसिद्ध साधना मासिक पुणे, श्रीमती संगीता बापट साधना मासिक पुणे, श्री चंद्रशेखर जोशी तरूण भारत जलगांव, श्रीमती संगीता दाहूरकर तरूण भारत जलगांव, डी. एल. दाहूरकर तरूण भारत जलगांव, मधुसूदन नेने दैनिक ऐक्य सातारा, श्रीमती सरला नवरे महाजन नवशक्ति मुंबई, सारंग दर्शने महाराष्ट्र टाईम्स मुंबई, अनिल डोंगरे महाराष्ट्र टाईम्स मुंबई, स्वप्नील पोरे केसरी पुणे, प्रदीप कुलकर्णी, केसरी पुणे, सुरेन्द्र गांगण लोकमत मुंबई, दत्ता पाटील गांवकरी प्रकाशन नाशिक, महानंद गाडगील महानगरी वार्ताहार मुंबई, माधव डोले सामना मुंबई, श्रीमती वर्षा सराडकर साप्ताहिक विदर्भ जागरण नागपुर, संदीप राउत वसई समाचार मुंबई, श्रीमती कल्याणी गाडगिल मराठी वर्ल्ड डाटकाम पुणे, प्रभाकर पाठक गोदातीर सामाचार परभणी, नारायण शिंदे मराठी स्वराज्य नांदेड, अरविंद जोशी आपला महानगर मुंबई, श्रीमती माधवी देशपांडे वृत्त मानस मुंबई, गौतम सूर्यवंशी साप्ताहिक समस्या पूर्ति परभणी.

मान्यवर राजनीतिज्ञ - श्री विलासराव देशमुख तत्कालीन मुख्यमंत्री महाराष्ट्र, श्री दिग्विजयसिंह मुख्यमंत्री मध्यप्रदेश, केन्द्रीय मंत्री श्री बाला साहेब विखे पाटील, महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री रामकृरूण मोरे, मध्यप्रदेशचे पूर्व मंत्री श्री महेश जोशी, श्री ललित जैन, श्री राजेन्द्र धारकर, वर्तमान आमदार श्री अश्विन जोशी, याशिवाय मध्यप्रदेशातील इंदूरचे महापौर श्री कैलाश विजयवर्गीय.

19 जानेवरी, 2001 रोजी लोकमाता अहिल्या नगरीत 74 अ.भा. मराठी साहित्य संमेलन प्रसंगी सम्मेलनात प्रसिद्ध झालेले ग्रंथ व इतर नियतकालिके (सूची)

 • सौंदर्यवती नर्मदा (सौंदर्य की नदी नर्मदा या श्री अमृतलाल बेगड यांच्या हिन्दी पुस्तकाचा मराठी अनुवाद) - सौ. मीनल फडणीस
 • मालव्यांतील मराठी कविता (1874 ते 2000) उन्मेष आणि विकास - श्री अनंत पोतदार
 • याला जीवन एसें नांव (गीतसंग्रह व कसेट) - सौ. सीमंतिनी सरदेसाई
 • एक नातं असेही (लघुकथासंग्रह) - श्रीमती कल्पना शुद्धवैशाख
 • मस्तानी बाजीराव (नाटक) - श्री नाना दुराफे
 • महासती अहिल्या (नाटक) - डा. गणेश मतकर
 • वसंत मासिक (संमेलन विशेषांक फेब्रुआरी 2001) - संपादक - श्री दिलीप बालशंकर देशपांडे
 • चारोलया (काव्य संग्रह) - डा. ए.डी. पाटील
 • मधुघट (कवितासंग्रह) - सौ. माधवी करमलकर
 • बहरून ये जरासा (गझल संग्रह-द्वितीयावृत्ति) - सौ. शोभा तेलंग
 • भारतीय संत कवयित्री (चरित्र) - संपादक ना.रा. कदम/देवीदास पोटे
 • लेव्हल क्रासिंग (कादंबरी) - श्रीराम कदम
 • डा. सौ. विजया राजाध्यक्ष यांचे कथाविश्व - डा. अलका भोपटकर
 • कथा कथन (कसेट) - सौ. अलकनंदा गद्रे
 • समाज चिंतन (पाक्षिक) - अनिलकुमार धडवईवाले
 • बी. फुललेला चाफा - डा. न.पा. खोडके
 • पारिजात - श्रीमती विजया रेटरेकर
 • दैनिक नईदुनिया इंदूर चे संमेलन परिशिष्ट 19 जानेवरी 2001 संपादक - श्री अभय छजलानी

अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन समारोप 2001 मधे मराठीबाबत श्वेतपत्रिकेच्या मागणीचा ठराव आणि मध्यप्रदेशात मराठी भाषेची हेलसांड होउ नये हा ठराव सुद्धा सर्वसम्मत मंजूर

महाराष्ट्राची राजभाषा मराठी असूनही प्रशासनासह सर्व व्यवहारात तिची पीछेहाट झाल्याचे दिसून येत असल्याने या सदर्भात राज्य शासनाने श्वेतपत्रिका करून मराठीचा सर्वांगीण विकास कार्यक्रम जाहीर करावा, तसेच मराठी हितरक्षिणी या नावांची शासकीय समिति स्थापन केली जावी या दोन मुख्य ठरावांसह एकूण 16 ठराव आज अ.भा. मराठी साहित्य संमेलनांच्या खुल्या अधिवेशनात संमत झाले.

मराठीबाबत श्वेतपत्रिका प्रकाशित करण्याच्या ठरावाचे सूचक प्रा. गंगाधर होते, तर कौतिकराव ढालोपाटील यांनी त्याला अनुमोदन दिले होते. मराठी हितरक्षिणी शासकीय समितीने मराठीवर होत असलेल्या अन्यायाची दखल घेत दरवर्षी अहवाल सादर करावा आणि उपाययोजना सुचवाव्या. या ठरावाचे सूचक मोहन आचार्य इंदूर होते. सीमाप्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारवर दबाव आणावा आणि त्याकरिता मराठी साहित्य महामंडलाच्या सीमाप्रश्न पाठपुरावा समितीचे साह्य घ्यावे, असा ठराव महामंडलाच्या अध्यक्षा वसुंधरा पेंडसे नाईक यांनी मांडला. त्याला डा. य.दि. फडके यांनी अनुमोदन दिले, तर देशातील सर्व ठिकाणच्या असल्याची नोंद जागरूकपणे करावी, असा संमेलनाध्यक्ष डा. विजया राजाध्यक्ष यांनी मांडलेला ठराव एकमताने संमत झाला. गोव्याची राजभाषा म्हणून कोकणीबरोबर मराठीलाही स्थान देण्यात आले पाहिजे, हा विनायक नाईक यांचा ठरावही एकमुखाने संमत झाला. महामंडलाच्या कार्यवाह सुहासिनी कीर्तिकर यांनी ठरावांचे वाचन केले. पु.ल. देशपांडे यांचा गौरव करण्यासाठी केन्द्र शासनाने टपाल तिकिट प्रकाशित करावे तसेच अंदमान येथील विमानतलाला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नाव देण्यात यावे, मध्यप्रदेश शासनाने प्राथमिक - माध्यमिक - उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणात मराठी भाषेला मातृभाषा म्हणुन शिक्षणाचा दर्जा द्यावा मराठी भाषेची हेलसांड होउ देउ नये असा ठराव इंदूरचे प्रा. रमेश खांडेकर यांनी मांडला तो ही सर्व सम्मत झाला. हे व असे महत्वपूर्ण ठरावही यावेली मंजूर करण्यात आले.

संमेलनात अहिल्यादेवीच्या महेश्वर घाटचा आकर्षक देखावा

74 व्या संमेलनात अहिल्यादेवींच्या महेश्वर घाटाचा 12Χ40 आकाराचा आकर्षक रंगीत देखाव्याचा भव्य फोटोग्राफ मुख्य कार्यक्रमाच्या रंगमंचाच्या पार्श्वभूमीत सजवण्यात आला होता. हा अप्रतिम फोटोग्राफ श्री भालू मोंढे यांचे फोटोग्राफीचे कौशल्यच म्हणावे ! तिन्ही दिवस संपूर्ण रंगमंचाची आकर्षक सजावट युवा रंगकर्मी श्री सुनील मतकर यांची होती. इंडोर स्टेडियमच्या बाहेरील आराखडा इंजि. श्री सुधाकर काले यांनी कलात्मक पद्धतीने आखलेला होता.